मलकापूर :- शहरातील माता महाकाली नगर परिसरात पोलिस व अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. १६ एप्रिल रोजी दुपारी सुमारास डॉ. गोठी यांच्या दवाखान्याजवळील ‘श्री स्वामी ट्रेडर्स’ या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये केशरयुक्त विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू, अन्नी गोल्ड स्वीट सुपारी, चंचल विलायची तसेच इतर सुपारीजन्य पदार्थ असा एकूण १८ हजार ५५३ रुपयांचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दुकानमालक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस करीत आहेत.