मोताळा :- मोताळा–मलकापूर मार्गावरील सांगळद शिवारात पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात बोराखेडी येथील ४५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत इसमाचे नाव शिवदास समाधान कांडेलकर (वय ४५, रा. बोराखेडी ता. मोताळा) असे असून ते पती-पत्नीसमवेत बोराखेडी येथे वास्तव्यास होते. अपघातानंतर त्यांना नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या संदर्भात डॉ. धिरज विक्रम म्हस्के यांच्या अहवालावरून ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक पुरुषोत्तम बाबुराव मार्वे यांनी बोराखेडी पोलिस पोस्टेला माहिती दिली. त्यानुसार बोराखेडी पोलिस पोस्टे येथे मर्ग क्र. १५/२०२६ कलम १९४ बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी वाघ करीत आहेत