घिर्णी येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता, शहर पोलिसांत हरविल्याची नोंद!

 

मलकापूर : – तालुक्यातील घिर्णी येथून एका १८ वर्षीय तरुणीने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. घिर्णी (ता. मलकापूर) येथील रहिवासी गणेश गुणवंत भारती (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कुं. दिपाली गणेश भारती (वय १८) ही घरात सर्वजण उपस्थित असताना अचानक बाहेर गेली. बराच वेळ लोटूनही ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करत परिसरात शोध घेतला; मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर वडिलांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद करून तरुणीचा शोध सुरू केला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!