हुंड्यावरून विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

 

मलकापूर : – हुंडा न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदरा (गुजरात) येथील मूळ रहिवासी व सध्या मलकापूर येथे वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर माहेरकडून अपेक्षित हुंडा न मिळाल्याचा राग धरून पती व सासरच्या मंडळींनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच मारहाण केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सततच्या छळामुळे त्रस्त झालेली पीडिता गेल्या चार वर्षांपासून माहेरी राहत असल्याचेही तिने नमूद केले आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे, नणंद तसेच विवाह जुळवून आणणाऱ्या नातेवाईक महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!