दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांना कुंड खुर्दतील 27 दिव्यांग बांधवांना मिळाला न्याय..

 

मलकापूर :- दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नामुळे कुंड खुर्द येथील 27 दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के अतिरिक्त दिव्यांग निधी मिळाला. शासनाकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी या बाबीपासून अनभिज्ञ असल्यामुळे कुंड खुर्द येथील 27 दिव्यांग बांधव शासनाच्या या पाच टक्के अतिरिक्त निधीपासून वंचित होते. या बाबीची दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांना जाणीव होताच त्यांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित केले. दिव्यांग बांधव वंचित का? यासंदर्भात त्यांनी स्थानिक ग्रामसेवक यांना जाब विचारला त्याचप्रमाणे शासनाचा हा अतिरिक्त ५% निधी दिव्यांग बांधवांना मिळाला पाहिजे या प्रामाणिक हेतूतून ग्रामसेवकाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामतः ग्रामपंचायत च्या वतीने त्या 27 दिव्यांग बांधवांना वस्तूच्या स्वरूपात प्रति दिव्यांग एक एक्वाची कॅन आणि बजाज कंपनीचे प्रेस याप्रमाणे 27 हजार रुपयांच्या वस्तूच्या स्वरूपात निधी कुंड खुर्द ग्रामपंचायत चे सरपंच सौ वैशालीताई राकेश पाटील व ग्राम पंचायत सचिव सपकाळ ग्रामपंचायत सदस्य सौ लताबाई अशोक झनके आणि मनोहर नारायण वराडे
दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांचे हस्ते वाटप करण्यात आला.
एकंदर दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नामुळे त्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा अतिरिक्त पाच टक्के निधी प्राप्त झाला हे विशेष. तर दिव्यांग निधी मिळवून दिल्याबद्दल त्या दिव्यांग बांधवांकडून दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे आभार सुद्धा मानण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!