राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमरावती विभागाची विजयी सलामी; 3 सुवर्ण, 3 रौप्य, 8 कांस्य पदकांची कमाई

 

मलकापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, यांच्या विद्यमाने व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुले व मुली २०२६ ही सातारा येथील श्री छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल ला दिनांक २ ते ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत आपल्या अमरावती विभागातून २२ खेळाडू मुले व मुली राज्यस्तरावर सहभागी झाले होते त्यात १७ वर्षे वयोगटात मुलींमधून ५२ किलो मधून कु.जानवी मोहता तृतीय, तर मुलांमधून ५३ किलो मधून अभिनव मोहोड तृतीय, ५९ किलो मधून ओम इंगळे तृतीय, ६६ किलो मधून अरमान बेग तृतीय, ८३ किलो मधून तन्मय चव्हाण तृतीय, ९३ किलो मधून अंश पाठक द्वितीय
१९ वर्षे वयोगटात मुलींमधून ४३ किलो मधून कु .दिव्या पटेल तृतीय, ४७ किलो मधून कु.वेदिका तेलगोटे तृतीय,५७ किलो मधून कु.नैना जाधव तृतीय, ७२ किलो मधून कु.दीपाली दाभाले द्वितीय, मुलांमधून ५९ किलो मधून जय आहुजा द्वितीय, ८३ किलो मधून दर्शन जाधव प्रथम, ९३ किलो मधून आदित्य मांदडे प्रथम, +१२० किलो मधून श्लोक सूरडकर तृतीय तर सहभागी खेळाडूंमध्ये कु. अक्षरा पाटील, कु. रिमझिम कहार, कु. दिव्यांनी चंदन, कु. वेदिका लाखे, कु. निकिता गावंडे, चैतन्य अत्तुरकर, प्रथमेश अस्वार, प्रमोद सुलताने होते
तसेच संघ व्यवस्थापक म्हणून रामा मेहेसरे सर बुलढाणा व सुशील मोहोळ सर अकोला संघ प्रशिक्षक म्हणून कु. दीक्षा खराटे व सचिन हिवाळे सर यांनी आपली भूमिका पार पाडली सर्व विजयी खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षकांना दिले विजयी खेळाडूंचे अमरावती विभागातील पाचही जिल्हा पावर लिफ्टिंग संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!