बुलढाणा : केळवदहून बुलडाणाकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १० मे च्या रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा ते चिखली मार्गावरील केळवद येथील पवन गजानन खिल्लारे वय १७ वर्ष हा शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे जात असताना अंत्री तेली फाट्याजवळ अज्ञात वाहनाने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तो बेशुद्ध झाला. काही लोकांनी तात्काळ मदत करत पवनला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवार ११ मे ला सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून पवनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.