Headlines

म्हाडा कॉलनीतील पत्रकाराचे घर फोडले; १ लाखांचा ऐवज लंपास, बुलढाणा शहरातील घटना!

बुलढाणा :- म्हाडा कॉलनीत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या घरात चोरी झाली असून, चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. १५ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुढारी न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखडे हे कुटुंबासह १२ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. बुधवार, १५ जानेवारी रोजी ते घरी परतल्यावर दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहणी केल्यानंतर ९ ग्रॅम सोन्याची पोथ आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.चोरट्यांनी घरातील फ्रीजमधील दूध व मलाई खाल्ल्याचेही निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञांकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.म्हाडा कॉलनी हा शहराचा विस्तारित भाग असून, या परिसरात व्यसनी लोकांची वर्दळ वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात नियमित पोलीस गस्त नसल्याने चोरीच्या घटना घडत असल्याची ओरड होत आहे. चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!