नांदुरा :- ( उमेश ईटणारे ) राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वडनेर भोलजी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्मारक समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उद्या पार पडणार आहे.
अनावरण सोहळ्याचे उद्घाटन हुतात्मा संजयसिंह राजपूत यांची वीर पत्नी सौ. सुषमाताई संजयसिंह राजपूत (मलकापूर) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सौ. सुनिताताई रवींद्र सातव (सरपंच, वडनेर भोलजी) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. हा ऐतिहासिक सोहळा उद्या १२ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता पोलिस चौकीजवळ, वडनेर भोलजी, ता. नांदुरा, येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहेत. यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून कार्यक्रम सुरळीत पार पडेल.