मलकापूर ( उमेश इटणारे ):- स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत 20 वर्षीय तरुणाने जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दि.21 रोजी दीड वाजताच्या सुमारास सालीपुरा भागात घडली आहे.
तेजस महादेव सोनवणे वय 20 वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. तेजस हा सालीपुरा भागातील हेडकॉटर येथे परिवारासह वास्तव्यास होता. तेजस हा घरात एकटाच होता.आई बाबा दवाखान्यात गेलेले होते तर आबा आजी हे घराबाहेर बसलेले होते अशी माहिती आहे.यावेळी तेजसने घरातील धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार केले यावेळी तेजस रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. गळ्यावर वार करण्यासाठी तेजसने धारदार शस्त्र वापरल्याने तेजसच्या गळ्यावर खोल आणि गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तेजस चा मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. तेजसने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण समजू शकले नाही मात्र तेजसने टोकाचा निर्णय घेण्याआधी मित्राला व्हाट्सअप चिट्ठी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चिठ्ठीत तेजसने नेमकं काय लिहिलंय हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.