मोताळा-मलकापूर मार्गावर अपघात; ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू
मोताळा :- मोताळा–मलकापूर मार्गावरील सांगळद शिवारात पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात बोराखेडी येथील ४५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत इसमाचे नाव शिवदास समाधान कांडेलकर (वय ४५, रा. बोराखेडी ता. मोताळा) असे असून ते पती-पत्नीसमवेत बोराखेडी येथे वास्तव्यास…
