मलकापूर :- जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त एव्होनिथ स्टील पुरस्कृत उन्नती प्रकल्प व उपप्राथमिक आरोग्य केंद्र बेलाड यांच्या संयुक्त विद्यमाने बेलाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २७० महिला, किशोरी व नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. उन्नती प्रकल्पांतर्गत पान्हेरा , वाघुड, बेलाड, माकनेर व बहापुरा या गावांमध्ये लैंगिक व प्रजनन आरोग्य विषयावर जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा जैन आणि सीएचओ डॉ. राजिक कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रवा शेख, डॉ. मेघा पावडे, डॉ. नासिर जमादार, डॉ. सुविधा पवार, तुषार खंडागळे, डॉ. विशाल पवार तसेच एएनएम देविका हाटेकर उपस्थित होते. शिबिरामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोग, स्क्रीनिंग तपासणी, बीपी, शुगर, थायरॉईड, सीबीसी व ईसीजी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. गंभीर आजार आढळलेल्या महिलांना पुढील उपचारासाठी रेफरल देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमासाठी एव्होनिथतर्फे सीएसआर सहाय्यक व्यवस्थापक प्रफुल भोपळे, समीक्षा वडूरकर, शुभम मोरे, कुणाल भारतखडे तसेच दिलासा संस्थेचे प्रकल्प समन्वयक नरेश बाजरे व श्रीकांत घाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता HIMC चे प्रदीप कोल्हे यांनी केले. प्रकल्पाची माहिती पिंकी निमजे यांनी दिली, तर सुमित उगेमुगे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संगीता नावटकर, आकाश पाटील, सुवर्णा लोखंडे, आशा वर्कर आणि सीआरपी यांनी विशेष परिश्रम घेतले.