अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सहा महिन्यांची गर्भवती, तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा
सोनाळा : सोनाळा परिसरात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाचा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप मुख्य आरोपीवर करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणात इतर दोन जणांनीही मुलीवर दबाव टाकून तिला आरोपीसोबत राहण्यास…
