Headlines

शेगावात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; २९ जणांवर गुन्हे; १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त; श्रीनिवास टॉवरमधील कारवाईत २३ जणांचा समावेश

शेगाव : शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर शेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली. श्रीनिवास टॉवरमधील हॉलसह जुन्या बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल २९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. दोन्ही कारवायांमध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि ताशपत्ते असा एकूण १ लाख ६१ हजार…

Read More

फेसबुकवर मैत्री, हॉटेलमध्ये अत्याचार; संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी, फेसबुकवरील ओळख पडली महागात; लग्नाचे आमिष दाखवून स्टाफ नर्सवर अत्याचार

शेगाव : फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर जवळकीत झाल्यानंतर एका ३६ वर्षीय स्टाफ नर्सला लग्नाचे आमिष दाखवून तसेच संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून रोहित गजानन पहुरकर (वय ३२, रा. आम्रपाली नगर, शेगाव) याच्याविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

राहत्या घरी गळफास; २७ वर्षीय महिलेची आत्महत्या; शेगांव येथील घटना

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात एका २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कीर्ती राजेश गोंड (२७, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे….

Read More

रक्षाबंधनाच्या प्रवासाला निघालेल्यांवर बसस्थानकाचे छत कोसळले! शेगाव बसस्थानकात तीन महिला व तीन वर्षीय चिमुकला जखमी; जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शेगाव : रक्षाबंधनानिमित्त भावाच्या घरी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांवर शेगाव बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीनेच संकट कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर अचानक खाली कोसळून तीन महिला व तीन वर्षीय चिमुकला जखमी झाला. या घटनेने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून, जीर्ण झालेल्या बसस्थानक इमारतीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा…

Read More

शेगाव-नागझरी रोडवरील शेतातून ३० हजारांची केबल वायर चोरीला

शेगाव : शेगाव-नागझरी रोडवरील शेतातून अज्ञात चोरट्याने सुमारे ३० हजार रुपये किमतीची केबल वायर चोरून नेल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडिया नगर येथील विशाल अरुण कान्हेरकर (वय २७) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे….

Read More

शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेगाव : शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. हरलालका स्कूलजवळ छापा टाकून एका व्यक्तीकडून विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची पाकिटे असा ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलिसांचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या…

Read More

शेगाव येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव

शेगाव: हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती तसेच दैनिक लोक युवा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले. विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ६२८ प्रस्तावांमधून निवड करण्यात आलेल्या १२५ मान्यवरांना राज्यस्तरीय…

Read More

ऑटोच्या धडकेत कारचे नुकसान; चालकाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

शेगाव : भरधाव ऑटोने कारला धडक देऊन सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्यानंतर कारचालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शेगाव शहरातील अग्रसेन चौकात घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल प्रकाश अहीर (वय ४३, रा. पहुरजिरा, ता. खामगाव, सध्या रामानंद नगर, सुटाळा) यांनी याबाबत तक्रार दिली….

Read More

भरदिवसा घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, एसबीआय कॉलनीतील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेगाव : घरमालक दुपारच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेगाव शहरातील पारीजात नगर परिसरातील एसबीआय कॉलनीत ३० जुलै रोजी ही घटना घडली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप रामदास परळीकर (५८), सेवानिवृत्त गटनिदेशक,…

Read More

घरासमोर उभा केलेला ऑटो मध्यरात्री लंपास; शेगावात चोरीचा गुन्हा

शेगाव : घरासमोर उभा केलेला ऑटो मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरातील मुरारका शाळेसमोरील भुतबंगला परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुरारका शाळेसमोर, भुतबंगला परिसरात राहणारे श्रीकृष्ण भिमराव लासुरकर (वय ४४) हे ऑटोचालक आहेत. त्यांनी त्यांचा एमएच-२८-टी-३८८१ क्रमांकाचा पियाजिओ एपी डिझेल थ्री-व्हीलर…

Read More
error: Content is protected !!