नांदुऱ्यात प्रवाशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
नांदुरा : जुन्या बसस्थानकात प्रवाशांना लवकर खाली उतरण्याची सूचना केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना नांदुऱ्यात घडली. या प्रकरणी एका दाम्पत्यासह तिघांविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भास्कर कोळी (वय ४०) हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून, चालक जितेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्यासह…
