महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उमलते आयुष्य संपले; विजेच्या धक्क्याने आर्मीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू

जळगाव जामोद : खेर्डा खुर्द येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी घडली. शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेच्या खांबावरील ताणाच्या संपर्कात आल्याने २० वर्षीय संकेत प्रभाकर वेरुळकर याचा जागीच मृत्यू झाला. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनाने संपूर्ण…

Read More

शिवानी कलमेकर बनावट हत्याकांडात मोठी कारवाई; दोन पोलीस निरीक्षक निलंबित

जळगाव जामोद : राज्यभर गाजलेल्या शिवानी कलमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात तपासातील गंभीर त्रुटी आणि हलगर्जीपणाची दखल घेत प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांना ७ जून रोजी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून…

Read More

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा; शेताला कंपाउंड व मोबाइल शॉपीसाठी १० लाखांची मागणी

जळगाव जामोद :- लग्नात हुंडा कमी दिला तसेच मानपान योग्यरीत्या केले नसल्याचे कारण पुढे करत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेताला कंपाउंड बांधण्यासाठी आणि नवीन मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात…

Read More

शेतकाम करत असताना विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन २४ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

जळगाव जामोद : भेंडवळ बुद्रुक शिवारात शेतकाम करत असताना विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन एका २४ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संकेत निलेश ठाकरे (रा. चावरा, ता. जळगाव जामोद) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी १५ मे रोजी सकाळच्या सुमारास संकेत ठाकरे…

Read More

प्लॉट मोजणीसाठी १० हजारांची लाच; भूमापकासह मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव जामोद : प्लॉट मोजणीच्या कामासाठी नागरिकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १२ मे रोजी जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावावरील प्लॉटची मोजणी व्हावी यासाठी आवश्यक शासकीय शुल्क…

Read More

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; जळगांव जामोद येथील घटना

जळगांव जामोद : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या सुनगाव वेस भागातील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनगाव वेस येथील शेतकरी गोपाल लक्ष्मण भड (वय ५१) यांनी १ एप्रिल रोजी स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती…

Read More

शेतात आंब्याच्या झाडाला गळफास; ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सुनगाव (ता. जळगाव जामोद) : तालुक्यातील सुनगाव येथे एका ३६ वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण प्रल्हाद दामधर (वय ३६, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी २९ मार्च २०२६ रोजी…

Read More

शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; अडीच एकर मका जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

जळगाव जामोद : कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आली. ततारपूर शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कापणीसाठी तयार असलेला अडीच एकर मका जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना २८ मार्च रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली. या आगीत पीकासह शेतीपयोगी साहित्यही भस्मसात झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले…

Read More

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

आसलगाव : तालुक्यातील वडगाव पाटण येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथील अल्पवयीन मुलगी घरात खुर्चीवर बसून दूरदर्शन पाहत असताना गावातील सुरेश शालिग्राम…

Read More

पिंपळगाव काळे येथे मिरवणुकीत घोषणांवरून वाद; दोघे ताब्यात

  जळगाव जामोद : – तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे १९ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीदरम्यान घोषणाबाजीवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास डीजेवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरून दोन गट आमनेसामने आले आणि शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. परिस्थिती…

Read More
error: Content is protected !!