भर दिवसा घरातील दाग दागिने व रोख रक्कम चोरी ,६४ हजाराचा मुद्देमाल लंपास! शेगाव तालुक्यातील घटना
शेगाव : तालुक्यातील अळसणा येथे २ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नजमाबी शेख रफिक वय ३२ वर्ष रा. ग्राम आळसणा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे की माझे मुले घरीच असल्याने घराला कुलुप…
