शिक्षिकेचा पाठलाग करणारा ‘रोड रोमिओ’ शिक्षक निलंबित, जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीने कारवाई

चिखली : शहरातील ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे आणि वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकील अहमद अब्दुल रशीद, रा. चिखली, असे निलंबित शिक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या ‘रोड रोमिओ’ वृत्तीला चाप बसणार का, असा…

Read More

शाळेत जात असलेल्या शिक्षिकेला अडवून, ‘तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत मोबाईल क्रमांकची मागणी; तरुणावर गुन्हा

चिखली : शाळेत जाणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांक मागितल्याचा प्रकार चिखली शहरात समोर आला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजताच्या दरम्यान एका…

Read More

निर्माणाधीन इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू; फ्लॅट पाहणीदरम्यान घडली दुर्घटना

  चिखली : शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन इमारतीतील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४७ वर्षीय महिलेचा वरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत महिलेचे नाव वर्षा गुलाबराव चेके (वय ४७, रा. शाहूनगर, चिखली) असे…

Read More

स्वप्नांना बळ देणाऱ्या शहरातच रुग्णसेवेची नवी भरारी! डॉ. तुषार गोंधणे यांची दर गुरुवारी निःशुल्क त्वचारोग तपासणी सेवा

चिखली :- “ज्या मातीत स्वप्नांना आकार मिळाला, त्या मातीत समाजसेवेचे ऋण फेडणे हीच खरी कृतज्ञता,” या भावनेतून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी चिखली शहरात दर गुरुवारी निःशुल्क रुग्णसेवा सुरू केली आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्वचा,…

Read More

२४ तासांत मोटारसायकल चोरीचा छडा; आरोपी गजाआड चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४८ हजारांची दुचाकी ज

चिखली :- बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४८ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथील सुभाष पांडुरंग सुसते यांनी त्यांच्या मालकीची हीरो…

Read More

शेतजमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा

चिखली : देवनगर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुमन विजय पवार या आपल्या भावाच्या मालकीच्या गट क्रमांक ३६ मधील शेती कसत आहेत. ५ मे…

Read More

भरधाव एसटी बसचा कहर; महामार्गालगत उभ्या दुचाकींचा चक्काचूर; अवकाळी पावसापासून बचावासाठी थांबलेल्या प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला

चिखली : अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेला आश्रय घेतलेल्या प्रवाशांच्या दुचाकींवर भरधाव एसटी बस घुसल्याने गुरुवारी दुपारी चिखली-बुलढाणा मार्गावरील हातनी फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तब्बल १० ते १५ दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोर धरल्याने महामार्गावरून…

Read More

वळणावर भीषण अपघात; बुलेटस्वार युवकाचा मृत्यू, दोघे जखमी

चिखली : लग्नासाठी जात असलेल्या तिघा युवकांच्या बुलेटला वळणावर अपघात होऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान घडली. या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओम संजय जामदार (वय २८), जय सुनील जामदार (वय २२) आणि अभिजीत प्रमोद भवर (वय २५, सर्व…

Read More

मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू

चिखली :- पोलिस स्टेशनच्या होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली. आत्माराम उत्तम वखरे (रा. सवणा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास टपाल घेऊन दुचाकीने चिखलीहून बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदसमोरील शेताजवळ ते थांबले असता बुलढाण्याकडून येणाऱ्या एमएच-२८-बीबी-७३६० क्रमांकाच्या…

Read More

खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल विक्री; चिखलीतील पेट्रोलपंप मालकावर गुन्हा

चिखली : प्रशासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करून कॅन व बाटल्यांमध्ये इंधन विक्री केल्याप्रकरणी चिखली येथील एका पेट्रोलपंप मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत राहावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पेट्रोलपंपांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी जिल्हाधिकारी…

Read More
error: Content is protected !!