रस्ता अरुंद, मध्येच पोल… नागरिकांचे हाल, प्रशासन मौन; मलकापूर बसस्थानकासमोरील हायमास्ट पोलमुळे वाहतुकीस अडथळा!
( उमेश ईटणारे ) मलकापूर :- शहरातील बुलढाणा रोडवर बसस्थानकासमोर उभारण्यात आलेला हायमास्ट लाईट पोल आता वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच अरुंद आणि शहरातील मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्याच्या मधोमध पालिका प्रशासनाने बसवलेला हा पोल आता नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी कोणतीही पूर्वतयारी किंवा वाहतुकीचा सखोल अभ्यास…
