बस अनियंत्रित’ नऊ वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू, चुलत बहीण गंभीर जखमी, संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या
( वृतसंस्था )अमरावती :- भरधाव सिटी बस अनियंत्रित झाल्याने प्रीतम गोविंद निर्मळे (९) या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्यासोबत असलेलीचुलत बहीण वैष्णवी संजय निर्मळे (१२) ही गंभीर जखमी झाली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर सायन्सस्कोर मैदानाजवळ असलेल्या सिटी बसस्टॅण्डवर काल रविवारी ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला…
