Headlines

vidharbh

रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली, शेगाव पोस्टेत गुन्हा दाखल!

शेगावः येथील कालखेड रोडवर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली.याबाबत सुनिल जगन्नाथ ठोंबरे वय ५० वर्षे (तलाठी) रा. ओमनगर शेगांव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कालखेड रोडभाग नं ३ मध्ये असलेल्या…

Read More

पंचमुखी हनुमान मंदिर ते श्री क्षेत्र प्रति शेगाव (घिर्णी) पायदल दिंडीच्या शंभर वारी पूर्ण!

मलकापुर :- विदर्भाची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगावची ख्याती संपूर्ण जगामध्ये आहे तेथूनच शेगावला श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी प्रगट दिन, एकादशी आणि गुरुवारला हजारोंच्या संख्येने शेगावला येत .” नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते” गजरामध्ये तल्लीन होतात.यातच विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावांमध्ये शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर व समाधी…

Read More

लहू ब्रिगेड सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मलकापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती लहु बिग्रेड सेनाच्या वतीने शिवाजीनगर मधील अण्णाभाऊ साठे चौकात साजरी करण्यात आली. यावेळी लहू बिग्रेड सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव माणिकराव तायडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पन करून अभिवादन केले. यावेळी कृष्णा तायडे, गजानन बागई, संदीप सोनोने, नाला बोरले, प्रेम तायडे, गजानन चंदनशिव, योगेश,…

Read More

सततची नापिकी त्यात डोक्यावर “बँकेचे कर्ज’ अल्पभूधारक शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

आसलगाव : सततच्या नापिकीमुळे त्यात डोक्यावर बँकेचे कर्ज या विवचनेतून येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण दयाराम बघे वय वर्ष ५२ यांनी दि.३० जुलै रोजी आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षापासून सतत होत असलेल्या नापिकीमुळे व मागील वर्षी सुद्धा बोगस बियाणे मिळाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. अरुण बघे यांच्याजवळ १.११ आर इतकी…

Read More

गोडाऊन मधील 70 हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्याची चोरी, शेगाव शहर पोस्टेला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : विद्युत कंत्राटदाराने गोडाऊन मध्ये ठेवलेले ७० हजाराचे इलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना येथील श्रीकृष्ण नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार नितेश दिलीप माने (३३) यांनी पोस्टेत तक्रार दिली की त्यांनी द्वारकामाई श्रीकृष्ण नगरात इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर…

Read More

चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

चिखली:- चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक म्हणून अजय शंकर गिरी हे होते. काही दिवसापूर्वीच त्यांची मुंबईतून बुलढाणा येथे बदली झाली होती. अजय गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस…

Read More

म्हणे तुमचा क्यू आर कोड बंद पडेल, फॉर्मवर सह्या घेऊन सावरगाव नेहूच्या दुकानदाराची 95 हजारांनी फसवणूक

मलकापूर : भारत पे वरून ९५ हजार रूपयांचे माझ्या नावाने लोन घेऊन एटेल पेमेंट बँकेचे खाते उघडून फसवणूक केल्याप्रकरणी सावरगाव नेहू येथील शिवाजी दिनकर लांजुळकर यांनी नांदुरा पो. स्टे. ला तक्रार दाखल केली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, माझे सावरगाव येथे जय गजानन प्रोव्हीजन दुकान असून माझ्या दुकानावर भारत पे कडून क्यु आर…

Read More

बिबट्याने शिकार करून पाडल्या बैलाच्या फळश्या, बैल ठार, गाय दोर तोडून पळाल्याने वाचला जीव; मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील घटना!

मलकापूर :- बिबट्याने गाय आणि बैलावर हल्ला करून हल्ल्यात बैल ठार झाला तर गाय दोरी तोडून पळाल्याने गायचा जीव वाचला ही घटना भाडगणी परिसरातील काटी रस्त्यावर दि. 29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभयित झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की भाडगणी येथील काटी रस्त्यावर समाधान पांडुरंग चोपडे यांची शेती…

Read More

कृष्णाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी,मराठा पाटील युवक समिती मलकापूर यांचे तहसीलदारांना निवेदन

मलकापूर:- खंडणीसाठी अपहरण करून शेगांव तालुक्यातील नागझरी येथील निरागस बालक “कृष्णा”च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मराठा पाटील युवक समिती,मलकापूर यांचे वतीने तहसीलदार साहेब मलकापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराडे या निरागस मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली,ही घटना समाज मन सुन्न करणारी असून मराठा पाटील…

Read More

शेतात जात असताना महिलेचा विनयभंग, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा : शेतात जात असलेल्या ३३ वर्षीय विवाहिते सोबत तिघांनी कारमधून येऊन रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजे दरम्यान तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नांदुरा पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात…

Read More
error: Content is protected !!