सुलतानपूर येथे भरधाव दुचाकीची स्कुटीला धडक; ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

सुलतानपूर : दुकानाकडे जात असताना भरधाव दुचाकीने स्कुटीला धडक दिल्याने शेख मोहम्मद शेख मुसा (वय ५५) गंभीर जखमी झाले. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास सुलतानपूर येथे घडली. प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. शेख मोहम्मद हे एमएच २८ बीव्ही १४८४ क्रमांकाच्या स्कुटीने दुकानाकडे जात होते. यावेळी तिघेजण प्रवास करीत असलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीवरील तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी जखमी शेख मोहम्मद यांना तातडीने देसाई रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णवाहिकेतून जालना येथे हलविण्यात आले. सुलतानपूर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *