राष्ट्रीय महामार्गावर काळाचा घाला; ऑटो उलटून ५६ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू

हिंगणे गव्हाड : मलकापूरकडे प्रवासासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या ऑटोला राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. कन्हैया हॉटेलजवळ ऑटो अचानक उलटल्याने गंभीर जखमी झालेल्या ५६ वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
वासुदेव तोताराम तितरे (वय ५६, रा. हिंगणे गव्हाड) हे पत्नीसमवेत वडनेर भोलजी येथून मलकापूरकडे जाण्यासाठी प्रवाशी ऑटोने प्रवास करीत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कन्हैया हॉटेलजवळ ऑटो उलटल्याने अपघात झाला. या अपघातात तितरे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने मलकापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *