Headlines

रेल्वे रुंदीकरणासाठी तार कंपाऊंड केल्याने वडोदा येथील शेतकऱ्यांचा शेत रस्ता बंद झाल्याने तो रस्ता वहिवाटीसाठी तात्काळ मोकळा करण्याची शिवसेनेची (उबाठा) ची भुसावळ रेल्वे ऐ.डी.आर.एम यांच्या कडे मागणी; लेखी निवेदन सादर

मलकापूर:- तालुक्यातील वडोदा (पान्हेरा),वाघुड,विटाळी येथील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचा वडिलोपार्जित शेत रस्ता रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुंदीकरणाच्या नावाखाली तार कंपाऊंड करुन बंद केला असल्याने शेतकऱ्यांना शेतात वहिवाटीसाठी जाण्यास रस्ताच नसल्याने शिवसेना(उबाठा) जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख ललीत मुथा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी भुसावळ रेल्वे प्रबंधक (ऐ.डी.आर.एम)एम.के मीना यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले, मीना यांचेशी शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान रब्बी पिक गहू,तूर, हरभरा पिक शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत तिन महिन्यांसाठी वडोदा येथील तारेचे कुंपणातून मार्ग ठेवला जाणार असल्याचे उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांना सांगितले, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महसूल विभागाशी संपर्क म्हणून आज दि.18 नोव्हेंबर 26 रोजी तहसीलदार समाधान सोनवणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी कायमस्वरूपी रस्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील वडोदा, विटाळी, वाघुड या गावातील शेतकऱ्यांची 200 ते 250 वर्षापासून वडिलोपार्जित शेती आहे अद्यापही आमची शेतीची वहिवाट सुरूच आहे,आज रोजी रेल्वे रुंदीकरणाचे नावाखाली तारेचे कंपाऊंड केले असून आमचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला असल्याने सुमारे 400 एकर शेतीत वहिवाटीसाठी रस्ता राहिला नसल्याने सद्यस्थितीत दुष्काळजन्य परिस्थिती असून कोरडवाहू पिके लावण्यासाठी शेतात बैलगाडी,ट्रॅक्टर जाण्यास रस्ताच नसल्याने आम्हांस कायमस्वरूपी शेत रस्ता देण्याची मागणी करण्यात आली.शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तहसीलदार समाधान सोनवणे यांनी नायब तहसीलदार राठोड,मंडळ अधिकारी व्हि.एन कोल्हे, तलाठी नितीन काळवाघे यांना घटनास्थळी जावून पर्यायी रस्ता संदर्भात पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, गजानन क्षीरसागर सरपंच विटाळी, चंद्रशेखर फाटे उपसरपंच विटाळी,रवींद्र डोबाळे, विजय शिमरे, संदीप गायकवाड, संतोष इंगळे,विष्णू क्षीरसागर (जिल्हा उपाध्यक्ष किसान काँग्रेस), पुंडलिक मालठाणे, परमेश्वर डोबाळे, सुरेश गोंड, बाळू गवते, प्रकाश क्षीरसागर, वसंता तारापुरे, रामराव गायकवाड, जावेद खाॅ दाऊट खाॅ, शिवदास दळवी, गोपाळ बोरसे, ईश्वरदास बोरसे, दिगंबर साबे, शांताराम पारधी सह आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *