मलकापूर:- कामावरून घरी जात असलेल्या युवकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.14 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोहनपुरा भागात घडली. याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सैय्यद अजिग सैय्यद नुरा यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की शेख आबीद हा माझा भाचा आहे तो शहरातील कुरेशी नगर पारपेठ येथे त्याच्या परिवारासह राहतो. तसेच शेख इमरान याला मी ओळखतो मला रात्री दहा वाजताच्या सुमारास माहित पडले की मोहनपुरा येथे काही मुलांचे आपसात वाद चालू आहे म्हणून फिर्यादी तेथे गेले असता त्यांना त्यांचा भाचा आबिद शेख हा गंभीरित्या जखमी दिसला. त्यांनी याबाबत त्याला विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या मामाला सांगितले की मी काम करून घरी जात असताना तेथे मुलांचे वाद चालू होते त्यामधील शेख अहसान इरफान शेख रा.मोहनपुरा याने जवळ येऊन मोठा दगड माझ्या डोक्यात मारला या दरम्यान मी रक्तबंबाळ झालो. त्यानंतर तेथे सोबत असणारे शेख मेहमूद शेख रशीद याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने आबीद यांच्या डाव्या दंडावर मारहाण केली. शेख अनिस शेख शरीफ याने मला पकडून ठेवले शेख अकरम शेख शहीद याने लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच माझा मित्र शेख इम्रान शेख लुकमान हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला सुद्धा कपाळावर मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी सैय्यद अजीम सैय्यद नूरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख अहसान इरफान शेख, शेख मेहबूब शेख रशीद, शेख अनिस शेख शरीफ, शेख अकरम शेख शहीद यांच्या विरुद्ध कलम 326, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे