Headlines

समृद्धीवर पुन्हा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार

डोणगाव : समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की मृतदेहाची अवस्था विद्रूप झाली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळताच डोणगाव पोलिस, महामार्ग पोलिस, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून त्याचा शोध घेण्यासाठी समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. मृत व्यक्ती महामार्गावर कशी आली, अपघात नेमका कोणत्या वाहनाने केला की अन्य काही घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास डोणगाव पोलिस करीत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर घडलेला हा सलग तिसरा अपघात असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!