Headlines

महाविस्तार योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

*घिर्णी मलकापूर, दि. 11 ऑगस्ट 2026* : राज्य शासनाच्या “महाविस्तार” कृषी विस्तार योजनेअंतर्गत घिरणी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मलकापूर यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर व मोहीम दिवस साजरा करण्यात आला. महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी हा मोहीम दिवस घेण्याचे ठरले आहे.

या शिबिरात तालुका कृषी अधिकारी श्री. ललित सूर्यवंशी साहेब, मंडळ अधिकारी आर. टी. पवार आणि सहाय्यक कृषी अधिकारी बी. के. इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात सुमारे 40 ते 60 शेतकरी उपस्थित होते.

*शिबिरातील महत्वाचे मुद्दे:*

1. *महाविस्तार AI अँप* : शेतकऱ्यांना या अँपद्वारे पीक सल्ला, हवामान अंदाज आणि तज्ञांचे मार्गदर्शन मोबाईलवरच कसे मिळेल याबत माहिती देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी यावेळी अँपवर नोंदणी केली.
2. *कृषी विभाग योजना* : कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
3. *फार्मर ID* : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID काढणे बंधनकारक असल्याचे सांगून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
4. *पीक सल्ला* : सध्याच्या हंगामासाठी योग्य पीक सल्ला देण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी म्हणाले, _”महाविस्तार AI अँपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!