करडी फाटा पेट्रोलपंप चोरीचा उलगडा; एक लाखांहून अधिक रक्कम जप्त, युवक अटकेत

धाड : करडी फाटा येथील पेट्रोलपंपातून चोरीला गेलेल्या एक लाख पाच हजार रुपयांच्या रोकडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या प्रकरणात मोंढाळा येथील १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून, चोरीची संपूर्ण रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, म्हसला बुद्रूक येथील खंडू संतोषराव भोंडे (वय ३७) यांनी धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या करडी फाटा येथील पेट्रोलपंपावर १५ जुलैच्या रात्रीपासून १६ जुलैच्या सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्याने एक लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मोंढाळा येथील १९ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर चोरीची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलिसांकडून सुरू असून, आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!