रेल्वे स्टेशनकडे जाताना युवकाला मारहाण ; जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरात उशिरा रात्री रेल्वे स्टेशनकडे जात असताना एका युवकावर दोघांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिष्णा सुरेश काचकुटे (वय २८, रा. गणपती नगर भाग-१, मलकापूर) हा १४ एप्रिल रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास रेल्वेने अहिल्यानगर येथे जाण्यासाठी पायी स्टेशनकडे जात होता. दरम्यान, गौरव व त्याचा एक साथीदार यांनी त्याला अडवून अंधाऱ्या ठिकाणी ओढत नेले.
पीडिताने विरोध केला असता दोघांनी त्याच्यावर हल्ला करत मारहाण केली. यामध्ये गौरव याने डोळ्याजवळ बुक्का मारत फायटरसदृश्य वस्तूने चेहऱ्यावर वार करून जखमी केले. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, तक्रार दिल्यास तुला व तुझ्या वडिलांना जीवे मारू, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अप. क्र. २७९/२०२६ नुसार बीएनएस कलम ११८(१), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार निबोळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!