मलकापुरात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाही? दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली!

 

मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून, एका नोकरदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याची घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. जनता महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर ही घटना घडली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अर्बन बँक कॉलनी येथील रहिवासी मेघा विष्णू देशमुख या कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी एकाने अचानक त्यांच्या गळ्यातील अंदाजे २८ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली. घटनेनंतर दोघेही वेगाने पळून गेले. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांत चोरी व साखळीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!