संग्रामपूर : वारी भैरवगड येथील वान नदीपात्रातील शंभू डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी जहाँ. येथील २२ वर्षीय रामसिंग दगडूसिंग सोळंके हा अविवाहित तरुण गुरुवारी मामा-भासाच्या डोहालगत शंभू डोहात तरंगताना आढळून आला. घटनास्थळ तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मृतक हा १९ जूनपासून घरून निघून गेला होता.
हिवरखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात हिवरखेड पोलिस कर्मचारी करीत आहेत