Headlines

मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहीम

मलकापूर :- उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते साहेब, जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण साहेब, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जैन मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंबरकर साहेब, आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप पटेल साहेब, ढोले साहेब व मापारी साहेब अवैद्यकीय सहाय्यक (कुष्ठरोग) आरोग्य सहाय्यक पाखरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे जनजागरण सभा पार पडली.

सभेमध्ये आरोग्य सहाय्यक पाखरे यांनी हिवताप, डेंग्यू आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन हिवताप कोणत्या डासापासून होतो व डेंग्यू आजार कोणत्या डासापासून होतो याबद्दल माहिती दिली.
तसेच उपाययोजनेत आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत, अंगभर कपडे घालण्याबाबत, कोरडा दिवस पाळण्याबाबत, मच्छरदाणीचा वापर करण्याबाबत, डास चावणार नाही अशा साधनांचा वापर करण्याबाबत, दरवाजे, खिडक्या, गॅस पाईपला जाळी बसविणे बाबत मार्गदर्शन केले.

घराभोवती डबके साचू देऊ नयेत, साचले असेल तर त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत किंवा ऑइलचा वापर करावा. ताप आल्यास रक्ताची चाचणी करून अहवालानुसार उपचार घ्यावा. प्रसंगी जोशी आरोग्य सेवक, सुपे आरोग्य सेवक, पवार आरोग्य सेवक व शहरातील कार्यरत आशा स्वयम सेविका यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!