बुलडाणाः बुलडाणा ते सैलानी एसटी बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याची घटना दि. २० जून रोजी ५:३० वा. दरम्यान शहरातील भवटे हॉस्पिटल समोर घडली आहे.एसटी बस मध्ये तब्बल ५० ते ६० प्रवासी होते मात्र एसटी बस चालकाने एसटीवरील नियंत्रण पकडून बस रस्त्याच्या बाजूला लावली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. एसटी बसचा रोड तुटल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. एसटी प्रशासनाचा हा हालगर्जीपणाच म्हणावा लागेल. एस टी रस्त्यावर बंद पडणे हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. यामुळे प्रवाशांना नाहाक मनस्ताप सहन तर करावा लागतोच पण एखाद वेळी जीव सुध्दा गमावावा लागू शकतो. एस टी प्रशासनाने या बाबींकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.