Headlines

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या इसमाचा इलेक्ट्रिक मशीन सुरू करतांना पाय घसरून पडल्याने पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या इसमाचा वाघोळा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. 19 जून रोजी सकाळी उघडकीस आली. ( कांतीलाल काशिनाथ पाचपोळ वय (४६, रा. वाघोळा ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की कांतीलाल पाचपोळ हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. इलेक्ट्रिक मशीन सुरू करतांना पाय घसरून पडल्याने ते नदी पात्रात बुडाले. रात्री उशिरा पर्यंत घरी परतले नाही त्यामुळे घरच्यांनी त्त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ते कुठेही मिळून आले नाही. बुधवारी पूर्णा नदीच्या काठावर कांतीलाल काशीनाथ पाचपोळ यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *