Headlines

मलकापूर शहरातील मार्केट टीनसेटमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

मलकापूर : शहरातील मुख्य मार्केटमधील टीनसेट परिसरात आज (२३ जून) दुपारी एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृतदेह ६५ वर्ष वयोगटातील पुरुषाचा असून त्याने अंगावर कोणताही शर्ट घातलेला नाही. त्याने पिवळसर-खाकी रंगाची पॅण्ट परिधान केलेली आहे. गळ्यात लालसर रंगाचा दोरा तर कमरेला लाल रंगाचा करदोड बांधलेला आहे. मृतदेह टीनसेट मार्केटमधील एका कोपऱ्यात आढळून आला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली असून, याबाबतची नोंद पोलीस स्टेशन मलकापूर येथे दुपारी २.४१ वाजता करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भामोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोणालाही सदर इसमाची ओळख पटल्यास त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन मलकापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!