जलंब : खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील लांजुड फाट्यावर जलंब पोलिसांनी सापळा रचून ३७ लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा पकडला. आयशर गाडी (MH ०९ EM ९९९४) मधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात होती.
या कारवाईत २३.६८ लाखांचा गुटखा व १५ लाखांची आयशर गाडी असा एकूण ३८.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल सांगळे आणि त्यांच्या पथकाने केली. जलंब पो. स्टे हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा प्रथमच पकडला गेला असून स्थानिक गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.