Headlines

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या; धा. बढे येथील घटना

 

मोताळा – धा. बढे : मोताळा तालुक्यातील नाईकनगर येथे एका ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (९ एप्रिल) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत इसमाचे नाव विनोद सुदाम राठोड (वय ४५) असे आहे.
नाईकनगर येथील रहिवासी आकाश संतोष पवार हे बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या चुलत भावाने त्यांना फोनवरुन माहिती दिली की, राठोड यांच्या घरातून काही हालचाल किंवा आवाज येत नसल्याने संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले. त्यावेळी विनोद राठोड हे घरातील लोखंडी पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेनंतर आकाश पवार यांनी धा. बढे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मर्ग दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास सहाय्यक फौजदार गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!