Headlines

बंद घर फोडून ७४ हजारांची चोरी; शेगाव येथील घटना

शेगाव:- शहरातील तहसील कार्यालयाजवळ अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून ७४,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तक्रारदार निकेश अशोक जैन (३२) हे कुटुंबासह अहमदाबाद येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराचे मुख्य दार तोडून आत प्रवेश केला. ५ मार्च रोजी जैन कुटुंब परत आल्यानंतर मुख्य दरवाजा उघडा असल्याचे आढळले, मात्र आतून कडी लावलेली होती. घरात प्रवेश केल्यावर २४,००० रुपये रोख आणि ५०,००० रुपये किमतीचे वडिलोपार्जित सोने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३३१(४), ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!