Headlines

अज्ञात टिप्परच्या धडकेत तरुण ठा-र; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : मुक्ताईनगर रोडवर भरधाव अज्ञात टिप्परने एका तरुणाला चिरडल्याने तो जागीच ठा-र झाला. ही घटना मलकापूर तहसील कार्यालयाजवळ, जिल्हा परिषद शाळेसमोर ४ फेब्रुवारी रात्री १० वाजता घडली. मृत तरुणाचे नाव प्रवीण श्रीराम फुंदे (वय ३२, रा. कुंड बुद्रुक, ता. मलकापूर) असे आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, छत्रपती शिवाजी नगरकडून तहसील चौकाकडे भरधाव वेगाने वाळूने भरलेले टिप्पर येत होते. त्याच वेळी, आरटीओची गाडी येत असल्याची माहिती मिळाल्याने टिप्पर चालकाने अचानक वळण घेतले, त्यामुळे पाठीमागून पायदळ जात असलेले प्रवीण फुंदे टिप्परखाली आले आणि त्यांचा जागीच मृ-त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. अज्ञात टिप्परचा शोध सुरू असून, ही दु-र्घ-ट-ना अवैध वाळू वाहतुकीमुळे घडल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!