Headlines

प्रवाशांच्या गर्दीत सोनसाखळी चोरी; 70 मन्यांच्या सोनसाखळीतून ५३ मणी सापडले, मलकापूर बसस्थानकातील घटना!

 

मलकापूर: मंगळवारी सकाळी मलकापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे बस तब्बल दोन तास थांबवावी लागली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांची चौकशी केली. पिंपळगाव देवी येथे जाणाऱ्या मलकापूर आगाराच्या बसमध्ये ही घटना घडली. सरला अजाबराव जाधव (५३) या महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालकाने गाडी थेट पोलिस ठाण्यात नेली. तपासादरम्यान ७० मण्यांच्या सोनसाखळीतून ५३ मणी सापडले, तर १७ मणी आणि पदक अद्याप गायब आहेत. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे काही मणी सापडले, मात्र पूर्ण सोनसाखळी मिळू शकली नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, महिलांनी गर्दीत दागिने सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!