Headlines

राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मलकापूर – राज्यस्तरीय कुणबी-मराठा समाजाचा भव्य दिव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यासाठी आज मलकापुर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष अमोल टप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

या बैठकीत पारंपरिक पद्धतींसह आधुनिक तंत्रांचा अवलंब करून समाज बांधवांसाठी सोयीस्कर वधू-वर मेळावा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय टाळून समाज संघटित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महामेळावा आयोजनासाठी निर्देश
सकल समाज बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ग्राम पातळीवर आणि शहरी भागात वेगवेगळ्या आयोजन समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. या मेळाव्यात वधू-वरांची माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर करून अधिक कार्यक्षमतेने जोडप्यांची सोयरीक ठरण्याचा मानस आहे. बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंड, प्रदेश सचिव प्रवीण कान्हे, जिल्हाध्यक्ष अमोल टप, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांसह अनिल सरप, महादेव पवार, किसनराव कंकाळे, रामदास रोठे, विठ्ठल गावंडे, सचिन गायकवाड, वैभव पाटील, सुनिल बाबुराव संबारे, चंद्रकांत गावंडे, शरद मोरखेडे, तुकाराम कापडे, युवराज माताडे आदींचा समावेश होता. बैठकीचा समारोप समाजाच्या हितासाठी अधिकाधिक बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!