Headlines

कुत्रा आडवा आल्याने कारचा अपघात; सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले

बुलढाणा :- समृद्धी महामार्गावर गुरुवारी १६ जानेवारी रोजी कुत्रा आडवा आल्याने कार (एमएच १२-एफवाय ५९०९) अनियंत्रित होऊन बेरिकेडला धडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले, पण सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले. सिंदखेडराजा जवळ घडलेल्या या अपघातात स्लोक कोळमकर (२४) व पुष्पेंद्र गुभा (२७) गंभीर जखमी झाले. मोनाली टीपाल (२८) आणि चालक संकरित रेड्डी (२३) किरकोळ जखमी झाले.

रुग्णवाहिका व महामार्ग पोलीस दलाच्या मदतीने जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!