Headlines

किरकोळ कारणावरून मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल! मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा येथील घटना

मलकापूर: तालुक्यातील जांभूळधाबा येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्षासह त्यांच्या नातेवाईकावर मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी गजानन नीना मेहेंगे (वय ५५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे हा प्रकार घडला. मंदिराचे माजी अध्यक्ष यांच्या निधनानंतर दोन महिन्यांपूर्वी दिलीप समाधान मुंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यामुळे आरोपींमध्ये नाराजी होती.

गुरुवारी रात्री ९ वाजता गणेश शेषराव कुणबीथोप यांनी फिर्यादीला श्रीकृष्ण मंदिराजवळ बोलावले. त्यावेळी तेथे गणेशसोबत त्याचे चुलत भाऊ संदीप सदाशिव कुणबीथोप आणि मनोहर सदाशिव कुणबीथोप उपस्थित होते. अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरून वादाला तोंड फुटले आणि संदीपने चिडून गजानन मेहेंगे यांना मारहाण केली. शिवाय मनोहरनेही त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली.
या घटनेत हस्तक्षेप करणाऱ्या श्रीकृष्ण दगडू मुंढे यालाही मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गजानन मेहेंगे यांच्या फिर्यादीवरून गणेश शेषराव कुणबीथोप, संदीप सदाशिव कुणबीथोप, व मनोहर सदाशिव कुणबीथोप या तिघांविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!