बुलडाणा :- एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 7 जूनला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील महावीर नगर भागात उघडकीस आली आहे.
( आदित्य संजय गिरी वय 16 )असे मृतकाचे तरुणाचे नाव आहे. आदित्य हा शहरातील महावीर नगर भागात परिवारासह वास्तव्यास आहे. आदित्य 9 व्या वर्गात शिक्षण घेत होता.आज दुपारी घरी कोणीच नसताना आदित्यने गळफास घेतला. हे बाब सायंकाळी घरच्यांच्या लक्षात आली त्यांनी आदित्यला खाली उतरवून बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदित्यने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेने गिरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.