Headlines

दोन ट्रकांची समोरासमोर धडक; दोघे जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : मलकापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हॉटेल सूर्या नजीक दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात घडला. ही घटना 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मालवाहतूक ट्रक आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकाची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे समोरील भाग पूर्णतः चिरडले गेले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!