मलकापूर:- पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापुर शहर पोलीसांना नॅशनल हायवे 53 वरून भुसावळकडे जात असलेल्या एक आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली पोलीस दलाने तत्काळ कारवाईस प्रारंभ केला आणि माहीती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांना कळवून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मलकापुर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री गजानन कौळासे, श्याम कपले, दिलीप रोकडे, आनंद माने, शेख आसिफ, योगेश तायडे, संतोष कुमावत व नवल राठोड यांच्यासह पोलिसांचे पथक नॅशनल हायवेवर यादगार हॉटेलच्या जवळ तैनात झाले.
पोलिसांना मिळालेल्या वाहनाच्या क्रमांकावरून ट्रक येत असताना पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला. ट्रक थांबविल्यानंतर, चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव शहीद रहेमत (वय 37, रा. मेवात, हरियाणा) असे सांगितले. परंतु त्याचे उत्तर अव्यक्त आणि गोंधळलेले होते, यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
त्यानंतर पोलिसांनी ट्रकचे मागील गेट उघडून तपास केला असता त्यावर एक सिल लागलेला दिसला. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि शासकीय पंचांना उपस्थित करून त्या वाहणाचे सिल तोडले आणि गाडीतील मालाची तपासणी केली. तपासणीदरम्यान, गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.
जप्त मालाची माहिती:
1. राज निवास पान मसाला व सुवासिक केशर जर्दा (किंमत – ₹63,36,000/-)
2. आयशर ट्रक (क्रमांक RJ 02 JC 5419) (किंमत – ₹22,00,000/-)
कुल मुद्देमाल: ₹85,36,000/- एवढा आहे.
सदर कारवाईनंतर संबंधित ट्रक आणि माल जप्त करून पोलीस स्टेशन मलकापुर येथे आणले गेले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.