मलकापूर : तालुक्यातील बेलाड शिवारातील विनोद पुंजाजी संबारे (वय ४८) यांच्या शेतातील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवली. यामध्ये त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.याबाबत संबारे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेलाड शिवारात विनोद संबारे व ज्ञानेश्वर संबारे या दोघांनी आपल्या शेतातील सोयाबीन सोंगून शेतात एकाच ठिकाणी गंजी केली होती. शेतातून घरी आल्यावर कोणीतरी सूडबुद्धीने अज्ञात व्यक्तीने सोयाबीन गंजी पेटवली. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात गेल्यावर उघडकीस आली. यामध्ये १४ क्विंटल सोयाबीनचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.