Headlines

वडिलांच्या स्मरणार्थ धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त पत्रकारांना भारतीय संविधान व उद्देशिका वाटप

मलकापूर :- द पीपल्स बहुउद्देशीय संस्था मुबंई महाराष्ट्र संस्थे मार्फत देशात अनेक समज उपयोगी कार्यक्रमचे आयोजन केले जाते त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमरकुमार आनंद तायडे यांचे वडील कालकाथित आनंद तायडे यांच्या स्मरणार्थ दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी निमित्ताने मलकापूर येथील रेल्वे स्थानकाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मलकापूर येथील पत्रकार बंधूंना लोकशाही रक्षणासाठी भारतीय संविधान वाटप केली तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना देखील त्यांनी भारतीय संविधान उद्देशिकाचें वाटप केले त्यात प्रामुख्याने प्राध्यापक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या मुलांचा सहभाग होता. डॉ अमरकुमार तायडे व त्यांची टीम पंचक्रोशी मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविन्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच ते महाराष्ट्र संविधान जनजागृती अभिमान अंतर्गत देशात संविधान प्रचार-प्रसारकाचे कार्य करतात. यावेळी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमीचे औपचारिक साधून त्यांनी संविधान व उद्देशिक वाटप करत एक आदर्श निर्माण केला आहे समाजातील तरुण कसा असावा तर डॉ.अमरकुमार तायडे सारखा असावा अशा चर्चा शहारत होत आहे. यापुढे ही डॉ.अमरकुमार तायडे यांचा मार्गदर्शनाखाली अनेक समज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत असे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख करण झनके बुलढाणा शाखेचे प्रा नरेंद्र सुरडकर यांनी माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!