Headlines

पाइपलाइनच्या व शेतरस्त्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉडने हाणामारी, परस्पर तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल!

मोताळाः शेतरस्ता तथा पाण्याच्या पाइपलाइनच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि काठीने हाणामारी झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोटा येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा येथील रामेश्वर पुंडलिक सरोदे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते घरासमोर असताना गावातीलच शंकर श्रीराम सरोदे यांनी शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून रामेश्वर सरोदे आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टरच्या टॉमीने मारहाण केली. दरम्यान गणेश शंकर सरोदे आणि उमेश शंकर सरोदे यांनी काठीने मारहाण केली अशा तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील शंकर श्रीराम सरोदे यांनीही तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची पुंडलिक बाबुराव सरोदे, रामेश्वर पुंडलिक सरोदे आणि नामदेव पुंडलिक सरोदे यांच्या शेताच्या शेजारी विहीर असून ते आसपासच्या लोकांना शंकर सरोदे यांची पाइपलाइन अडविण्यास सांगत आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता तिघांनी संगनमत करून बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास लोटपाट, शिवीगाळ करीत रामेश्वर सरोदे यांनी लोखंडी टॉमी मारून जखमी केले. शंकर सरोदे यांच्या मुलाने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता नामदेव सरोदे यांनी खांद्यावर मारून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरूनही तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुपडासिंग चव्हाण हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!