Headlines

अपार्टमेंट मधील घर फोडून 1 लाख 31 हजाराचा मुद्देमाल लंपास, बुलढाणा शहरातील घटना

बुलढाणा :- घरमालक परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी नगदी रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना बुलढाणा शहरात बुलढाणा घडली.शहरातील गुलमोहर अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये पांढरे परिवार राहतात. मूळचे केळवद (तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) येथील रहिवासी पांढरे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा येथे राहावयास आले आहे. घटनेच्या दिवशी पांढरे परिवार विदर्भ पंढरी शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यावर परिवार बुलढाणा येथे परतला. ते गुलमोहर अपार्टमेंट मध्ये पोहोचले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले.घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघडलेले आणि सर्व साहित्य असताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेत कपाट मधील १ लाख रुपये रोख आणि ३१ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. घटनेची फिर्याद सनी संजय पांढरे यांनी बुलढाणा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मुळवे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *